Author Topic: असे तुटून पडले भ्याड लुच्चे (दिल्ली बलात्कार )  (Read 604 times)

Offline vaibhav_kul2003

  • Newbie
  • *
  • Posts: 7
असे तुटून पडले भ्याड लुच्चे (दिल्ली बलात्कार )

उमलताना मज कळीवर
तुटून पडले भ्याड लुच्चे
गुदमरला तो जीव भाजरा
देठ छाटले हिरवे कच्चे

असे तुटून पडले भ्याड लुच्चे

काल्यासारखे कुजकारले मज
अब्रूचे अन उडवले धज्जे
पंख कोवळे तुटून गेले
खांदे झाले खुज्जे खुज्जे

असे तुटून पडले भ्याड लुच्चे

किंकाळीत लव शब्द न फुटले
फुल मुरझले कच्चे-कच्चे
कुमारिकेला तडा देऊनी
तारुण्याचे दोन हिस्से

असे तुटून पडले भ्याड लुच्चे

तडफडला तव जीव कोवळा
पाखराची अशी उपटली पीस्से
शेवटचा आता श्वास घेउनी
वरून ऐकेन  माझे किस्से

असे तुटून पडले भ्याड लुच्चे

 
~वैभव कुलकर्णी~
 
« Last Edit: November 12, 2013, 11:09:54 PM by vaibhav_kul2003@yahoo.com »