Author Topic: घाटावरचा नावाडी (नर्मदाकाठच्या कविता )  (Read 733 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
घाटावरचा नावाडी
होता नाव वल्हवित
नेक धंदा पिढीजात
आपला प्रेमे करीत

डोळ्यामध्ये पण त्याच्या
उद्याचे काहूर होते
गाव आणि घाट त्याचे
बुडून जाणार होते

बाप आजा पणजोबा
या  घाटावर जगले
मी भाऊ अन ताईनी
इथेच जग जाणले     

दुजे काम करू काही
पोटाची या चिंता नाही
माईची पण साथ ही
आता मिळणार नाही

उदास स्वरात त्याच्या
विरहाची आग होती
नाळ तुटल्या इवल्या
अर्भकाची हाक होती

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 12:39:43 AM by MK ADMIN »