Author Topic: राजघाट-बिडवानी (नर्मदाकाठच्या कविता )  (Read 519 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550


किनाऱ्यावर थबकलेले
साचलेले पाणी
बुडालेल्या घाटावर
अवघडलेले पाणी
जागेवाचून स्नानाला
खोळंबले भक्तवर
त्या त्यांच्या विनंतीस
मैयाही निरुतर
आवारात मंदिराच्या
घुसलेल्या गाड्या
अतिपरिचयात
झालेली अवज्ञा
धीरगंभीर प्रसन्न
एकमुखी दत्त
चैतन्यानी दाटलेले
जागृत आसमंत
कुठल्याही धनाविन
ऋण मुक्तेश्वर
भरलेले पाणी तरीही
पंपाचा आधार
 
विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:32:16 AM by MK ADMIN »