Author Topic: प्रथम पुरूषी एक वचनी (अर्थात मी)  (Read 612 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
 
मलाच नाही समजत, कसा आहे मी
कधीकधी वाघ, कधी, ससा आहे मी
 
नकोसा झालो तरी, सवय कर आता
टाकता न येणारा, वसा आहे मी
 
जुन्या झाल्या सवयी, सुटतीलच कशा
चालवून घे आता, जसा आहे मी
 
लादल्या ओझ्यांनी, चालत राहीन
कुंभाराला गाढव, तसा आहे मी
 
एल्गारचा आवाज, उमटेलच कसा 
ओरडून सुकलेला, घसा आहे मी
 
जरा वाहता वारा, झुकून राहीन
वादळातही टिकीन, असा आहे मी
 
रिताच आहे साला, पेला सुखाचा
आठवणींनी भरला, पसा आहे मी
 
केदार...
मात्रा : १२+ ९

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
 किती सुंदर?~~~
''असा मी असा मी ''