Author Topic: अजूनी मी जगलोच नाही (विना वृत्त गझल )  (Read 580 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
इतकी वर्ष इथे आहे मी
इथला कधी झालोच नाही

किती पहिले देश दुरुनी
कुठे कधीही टिकलोच नाही

कथा वादळी कशी कळावी
सागरा जर भिडलोच नाही

सदा सांभाळी बूट विदेशी
कधी देवळी शिरलोच नाही

जगुनिया काडेपेटीत संपलो
अंगार कधी झालोच नाही

हा फेकावा जन्म म्हणे मी
भीतीने धजावलोच नाही

मरणे ते तर दूर राहिले
अजूनी मी जगलोच नाही

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 18, 2015, 12:58:26 AM by MK ADMIN »