तु ये. . (मन माझे)
माझ्या अंगणात रांगोळी घालाया ये
परसदारात रातराणी फुलवाया ये..
एकट्या माझ्या राती , एकटी माझी स्वप्ने
चांदण्या राती माझी स्वप्ने सजवाया ये..
दिवस बेशिस्त, रात्र अस्वस्थ , कुस बदलुन थकते रात्र माझी
ह्या बैचेन रातीच्या प्रश्नांची उत्तरे सांगाया ये..
तुझ्याशी भांडायचय पण मन कधीच धजावत नाही
असेच एकांती रुसुन-फुगुन माझ्याशी गोड गोड भांडाया ये..
तुझ्यासाठी जिव अर्पण , तुझ्यासाठी माझे डोळे दर्पण
ह्या दर्पणासमोर लाजाळुसारखे लाजाया ये..
मी उंबर्यात एकटाच उभा
आपल्या घराला तोरण बांधाया ये..
मी कधीचीच वाट पाहतोय तुझी
देव्हार्यात तुझ्या घरचा कृष्ण ठेवाया ये..
Unknown