Author Topic: अजूनही दुय्यम का ?(स्त्रीविषयक कविता)  (Read 1899 times)

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
खाली  मांडलेल्या  भावना  कदाचित  कविता  म्हणून  पूर्ण  नसतील  पण  कळकळ  जी वाटली  ती  अशी  कि,  घरासाठी  तितकेच  राबून  त्याची  योग्य  ती  किंमत  घरातल्या  स्त्रीला  मिळत  नाही, तिला  नेहमी  दुय्यम  स्थान  दिले  जाते.  हि परिस्थिती  मोल मजुरी करणाऱ्या  स्त्रियांपासून  corporate मध्ये  काम करणार्यांपर्यंत( उदा.  " हिच्या पगारात  काय  छोटे  खर्च  भागतात." ".................... हिचा  कसला  पगार, घरात  कंटाळते म्हणून  जाते  आपली........") आहे,
समाजाने  आता  बदलायला हवे............ मी  सुरुवात  केली  आहे..सेवेत  जन्म  माझा  रिता,
दुखात व्याकूळ मी  सीता.

किती  जन्म  भोगायचा  त्रास,
पुरे  आता  तरी  हा  वनवास,
रामाने  पाळण्या आज्ञा पित्याची,
वाट धरली  निमूट  वनवासाची,
मी  पाळण्या  धर्म  पतिव्रतेचा,
हात  धरिला  श्री रामाचा,
सोडून  स्वप्ने  माझी  सारी,
गेली  संगे  ना  फिरली  माघारी,
आणि   पुढे  किती  जन्म,
स्त्रीत्वास  अशी  लाचारी,
कधी मिळेल  स्थान  प्रथम,
कधी  होईल  स्वतंत्र  नारी,
वनवास  भोगून  राम,
झाला  पुन्हा  राजा,
राजा  विसरून  धर्म  पतीचा,
देई  वनवास  सीतेस  दुजा,
तरी  सांगे  सीता  बिचारी,
हा  जन्म  श्री रामाकरिता.
सेवेत  जन्म  माझा  रिता,
दुखात व्याकूळ मी  सीता.

जन्मताच  मी  ना  पसंत,
करती  आई बाप  हि  खंत,
ज्यास  अर्पावे  सारे  जीवन,
त्यानेही  द्यावे  दुय्यम  स्थान,
मी  राबते  फार  घरासाठी,
त्याची  कुणी करेचना गणती,
माझ्या  मिळकतीस  मूल्य शून्य,
माझ्या  मेहनतीची किंमत नगण्य,
मला  पंख  काय  कामाचे,
बंद  दरवाजे  आकाशाचे,
नाही  करायचा  मी  त्रागा,
माझ्या  आनंदास  नाही  जागा,
मी  जगावे बनून  सावली,
कुचंबना  झेलावी  वेळोवेळी,
तरी  राखण्या  घराची  लाज,
मी  भोगावे  सारे  सहज,
हवे  तसे  कुरवाळावे तुडवावे,
हा  शाप  जुना  प्राजक्ता.
सेवेत  जन्म  माझा  रिता,
दुखात व्याकूळ मी  सीता.

 
................अमोल

Marathi Kavita : मराठी कविता


Dilip Deshmukh

 • Guest
मला वाटते जमाना बदलला आहे . आता तर भारतात सर्वीकडे श्री राज्य आल्यासारखे वाटत आहे . जी चूक बाबासाहेबांनी दलितांना आरक्षण देऊन केली तसीच चूक आपण महिलांना आरक्षण देऊन करत आहोत असे मला वाटते . श्रीयांच्या आरक्षणामुळे बेकारी किती वाढली आहे हे माहित आहे का . मला तर असे वाटते कि पुढच्या पिढीला पुरुश्यासाठी आरेक्षण मागायची पाळी आली आहे .जी परस्तीती सवर्ण ची होत आहे तसीच पुरुषाची होऊ नये असे वाटते !
 :'( :'(

Asmita Marathe

 • Guest
Nice poem n the concept too.I agree with u Amol.
But,its difficult to change the mentality of public.
But at least you can initiate in that direction give due respect to ur Mom,Sister & wife & also to all the ladies u came across.

Regards,
Asmita Marathe.


ganeshkanade

 • Guest
Nice poem .I agree with you.   Ganesh

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
hummm ........... nice ...

vasudev

 • Guest
i agrree  with u...