Author Topic: एकाकि पथिक [Marathi translation of a Russian poem]  (Read 594 times)

Offline Ktulu

  • Newbie
  • *
  • Posts: 3
This is my Marathi translation of a Russian poem by Mikhail Lermontov. This is my first attempt of Russian - Marathi translation, all your suggestions and corrections are welcome! Original Russian poem with English translation is available on my blog. http://joshiabhisheks.blogspot.in/2014/11/blog-post.html


एकाकि पथिक

एकाकि पथिक आहे मी;
धुक्यात हरवलेल्या रस्त्याचा,
नि:शब्द रात्री वाळवंट परमेश्वराला शोधत आहे,
आणि तारे एकमेकांशी बोलत आहेत.

स्तब्ध आणि एकाकि आहे सृष्टी;
लपेटलेल्या निळ्या चांदण्यामधे,
का आहे एवढा मी दु:खी आणि कष्टी?
कशाची वाट पहातो आहे? की कसला पश्चाताप होतो आहे?

नाही! मला आता कसलिही आशा नाही;
आणि भुतकाळाबद्दल पश्चाताप नाही,
फक्त शांतता आणि मुक्ती हवी आहे,
विसरायचं आहे सर्व काही, चिरनिद्रेमधे.

पण नको आहे ते थडगं काळीज गोठवणारं;
मला हवी आहे चिरनिद्रा,
माझी जीवनज्योत हळूवार मालवताना,
तिचा ऊबदार श्वास मला स्पर्श करेल.

दिवस आणि रात्र, माझ्या कानाशी
गोड आवाज प्रेमगीते म्हणतील, आणि
माझ्यावर एक ओक वृक्ष
चिरकाल बहरेल.