Author Topic: एकांत [New]  (Read 758 times)

Offline Sameer Nikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 51
  • Gender: Male
  • Sameer Nikam
एकांत [New]
« on: September 25, 2012, 03:14:08 PM »
एकांत
वाटे हवा हवासा एकांत
जिथे मन होई  शांत

गुंतवी मनाला विचारांच्या जाळ्यात
जिथे सुटती सारे प्रश्न एका क्षणात

मिळे आधार एकांताचा मनाला
देई बळ तो नव्याने जगण्याला

मन रुतते आठवणीच्या खोलवर   
हळूच हासते हळूच रडते स्वतःच्या नशिबावर

इथे फुटती अंकुर नवकल्पनाला
जिथे मिळती नवी वाट अडखळलेल्या  आयुष्याला

मिळे ज्याची साथ  सुखा दुखात
दुसरे काही नसून आहे तो एकांत
 

समीर स निकम
« Last Edit: September 25, 2012, 03:14:41 PM by Sameer Nikam »

Marathi Kavita : मराठी कविता