Author Topic: राहून गेलेल्या गोष्टी.......:-)  (Read 1031 times)

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
.
काही वेळा ढग भरून येतात,
पण जसे ते अचानक येतात
तसेच विरूनही जातात,
मग 'बरसायचंच राहून गेलं',
हा सल राहतो आभाळाच्या पोटी,
तशाच काही वेळा
सलत , खुणावत राहतात,
आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी
,
अनेकदा उराशी जपलेली
निरनिराळी स्वप्ने
उचंबळून येतात,
आता ती साकारायची वेळही गेलेली असते,
आणि परीस्थितीही,
मग मनात रंगतो तो
जर-तर चा खेळ,
वाटतं साधताच आला नाही
आपल्याला आयुष्याचा मेळ,
कळलेच नाही कधी,
हातातून निसटली वेळ,
,
मग स्वप्ने फक्त स्वप्नेच राहून
मृगजळासारखी दिसत राहतात,
जगाला अदृश्य असली
तरी आपल्यासमोर,
लखलखत्या ताऱ्‍यापरी
चमकत राहतात,
अशावेळी वाईट वाटण्याला
उरत नाही अर्थ,
त्यापेक्षा याच ताऱ्‍यांच्या चांदण्यात पहुडावे,
अन् त्यांच्या गोड आठवणीँत
रमतच काढावी रात्र,
,
या स्वप्नांना सामोरं जायची
प्रत्येकाची असते तऱ्‍हा निराळी,
मग कधीतरी मैफिलीत विषय निघतो,
अन् जो तो सांगतो
ज्याची त्याची कहाणी आगळी,
,
कुणी दु:खी कष्टी होतं,
तर कोणी विषादानेच हसतं,
कुणी मजेनं सांगतं
'सारीच गंमत होती',
पण प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात
राहून गेलेल्या गोष्टी :-)
.
-व्टिँकल देशपांडे.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
khup chan kavita aahe...... gr8....

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
kavitechaa aashay chaan aahe pan jaraa aatopsheer havee hotee (he maaze vaiyaktik mat), krupayaa raag maanoo naye.

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
Khup Dhanyavad Kedar...:)
Dhanyavad Shashank.
Pan aatopati ghetali tar ti apurna rahate.aani apurna kavitela kahi artha nasto.
Kami shabdat jast bhavna vyakt karte ti kavita he manya pan keval kami shabdat lihanyachya attahasapoti mi manacha daar thothavnare shabda nakaru shakat nahi.
Nahi mi ragavle nahiye.pan mala je vatata te bolale.