Author Topic: *****माती*****  (Read 479 times)

Offline anuswami

  • Newbie
  • *
  • Posts: 20
*****माती*****
« on: September 22, 2014, 04:18:59 PM »
*****माती*****

सुवास मिळतो पहिल्या वर्षावाला
आनंदी मने सोनपिवळी होती
खरच किती अतूट माया तिची
स्वर्गाहून सुंदर माझी माय 'माती'तुडवितो तिजला रोजच आपण
तरीही नाराज न कधी ती होते
पापं सारी तिच्या पदरात घालून
एकलीच मायेचा घास देतेउदर भरभरून जातय आज
कष्ट्कर्याला केवळ सोबत तिची
वाऱ्याच्या झुळकेची जाणीव होते
म्हणते ती नको करू तू चिंता उद्याची


कळवळते नि ती म्हणते,


टोचू दे काटा पायी रे तुज्या
तू पुढच चालत रहा
वरुणदेव आज नाराज आहे
तयाकडे प्रेमाने तू पहाआला आहे तू माझ्यातुनच
सगळे माझ्यातच विरून जाती
सीमेंट ची जंगले बांधू नको रे
आठव तू सदा माय 'रानमाती'जन्म तुझा इथच आहे
नेहमी माझा हात असेल तुज हाती
जाणीव ठेव रे फक्त माझी
मी आजही तुझीच रे माय 'माती'

कवी : अनिकेत स्वामी,  अकलूज
९५५२०३०८२८

Marathi Kavita : मराठी कविता