Author Topic: **** कुत्रा ****  (Read 770 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
**** कुत्रा ****
« on: March 07, 2014, 06:26:21 PM »
**** कुत्रा ****
==========
सकाळी सकाळी कुत्र्यासोबत
फेरफटका मारतांना पाहतो माणसे
तेव्हा मनात विचार येतो
किती नसीब काढलंय या कुत्र्यानं
हिच्या मैत्रिणीच्या घरांत नऊ कुत्रे
गुण्यागोविंदान राहतात
त्यांना न्हाऊमाखू घालण्यापासून
सर्व काळजी तीच घेते नोकरी सांभाळून
तेव्हा वाटलं माणसांपेक्षा कुत्र्यांनाच
लळा लावलेला बरा
निदान पाठीत खंजीर खुपसण्याचा धोका नाही
अस्तव्यस्त जगत असतात किती माणसे
रस्त्यावर , फुटपाथवर
मनात आलं यांना लळा लावलां असता तरं …….
या विचारानचं मनात कापरं भरलं
कारण माणसांनी केलेले वार आठवले भराभर
कुत्र्यानं प्रामाणिकपणा दाखवून स्वतःला सिद्ध केलंय
माणसानं स्वतःच्या जातीचं नावं धुळीस मिळवलंय .
================================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ०६.०३.१४ वेळ :७.३०   


Marathi Kavita : मराठी कविता