Author Topic: *** गिधाडं ***  (Read 618 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
*** गिधाडं ***
« on: August 23, 2013, 07:33:09 PM »
मुंबईतील सामुहिक बलात्कार …
===============
*** गिधाडं *** …….……. संजय निकुंभ
===============
या गिधाडांना कायं कळणारं
उमलणाऱ्या कळीची कोमलता
तिचं फुलासारखं जगणं
अन तिच्या मनाची निरागसता

या गिधाडांना कायं कळणारं
तिचं मन जिंकण्यातली नशा
तिला फुलवतांना
तिचं प्रेम मिळवण्यातली मजा

या गिधाडांना कायं कळणारं
तिच्याशी अनेक  रूपांनी जोडलेली नाती
अन तिला उध्वस्त केल्यानंतर
कितीतरी मनांची होणारी माती

वासनांच्या आहारी जाऊन
फिरतं असतात हि गिधाडं कुठल्याही रस्त्यावर
एकटी दुकटी स्री बघून
तुटून पडतात ती तिच्या शरीरावर

हिंस्र भुकेल्या प्राण्याने सोलपटून काढावं सारं शरीर
तसं तिचं तनमन ओरबाडून घेतात
अन क्षणिक शरीराची भूक भागवून
अनंत काळाच्या यातना तिला देऊन जातात

सामुहिक बलात्कार करतांना
एकाही पुरुषाचं मन कसं द्रवत नाही
ती यातनांनी विव्हळत असतांना
यांची आई -बहिण कशी नजरेसमोर येत नाही

मजा मारल्यावर सालीला मस्त भोगलं
या आविर्भावात मन कसं जगू शकतं
अन काहीच न घडल्यासारखं
जग अन घरच्या स्री समोर कसं उभं राहू शकतं

या गिधाडांना कायं कळणारं
तिच्या आशा आकांक्षा
उध्वस्त झाल्यावर तन-मनात
निर्माण होणारी घोर निराशा

क्षणभंगूर भोगाचं हे शरीरसुख
असं कसं ओरबाडून घ्यावसं वाटतं
अन एका जित्या जिवाला काहीच चूक नसतांना
मरणासन्न अवस्थेत कसं सोडून जावसं वाटतं

मी हि किती नालायक आहे बघां नां
विनाकारण गिधाडांना बदनाम करतो आहे
अरे अशी कृती करणारा पुरुष तर
त्यांच्यापेक्षाही भयंकर यातनादायक प्राणी आहे .
===============================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २३ . ८ . १३     Marathi Kavita : मराठी कविता