Author Topic: *** नववर्षा ***  (Read 714 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
*** नववर्षा ***
« on: January 01, 2014, 09:41:41 PM »
      *** नववर्षा ***
--------------------------------
तू काय देशील मला नववर्षा   
मज हवे ते मिळवून दावीन
कितीही गुपिते असू दे तुझ्यात
प्रयत्नाच्या जोरावर यश मिळवीन

तू कितीही दिल्यास वेदना
चांदण समजून पांघरून घेईन
बळकट केलेय माझ्या मनास
माझे स्वप्न मीच साकारीन

भेटेन तुला पुन्हा नवीन वर्षी
सांगेन यशाचे रहस्य तुला
तूच तर शिकवतोय इतकी वर्षे
त्या अनुभवाने जग मुठीत घेईन .
======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १. १. १४ वेळ : ९ . १५ रा.   

Marathi Kavita : मराठी कविता