Author Topic: *** मोल ***  (Read 421 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
*** मोल ***
« on: June 14, 2015, 11:00:30 AM »
सात जन्माची ती नाळ
नको टाकु वृद्धाश्रमाला
काय मोल असते ममतेचे
विचार बिन आईच्या मुलाला

झाला जरी तु मोठा साहेब
विसरू नको त्याच्या घामाला
काय मोल असते पितृछायेचे
विचार बिन बापाच्या मुलाला

संवशयाची सुई टोचुन मनाला
नको लावु गालबोट तिच्या प्रेमाला
काय मोल असते विरह यातनेचे
विचार बिन सखीच्या सख्याला

नका लादु तुमच्या इतक्या अपेक्षा
पोर जाईल एक दिवस फासाला
काय होते हालत वांजोटी जगताना
विचारा बिन मुलाच्या आई बापाला

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता