Author Topic: ** मरणाने शिकविले जगणे आम्हाला !  (Read 740 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
मरणाने शिकविले जगणे आम्हाला !
जीवन जगणे रोजचे मरण आम्हाला !
धमन्यात रक्त होते शूरपणाचे
नशिबी आले गांडूगीरीचे जीणे आम्हाला
ताठ कणा आणि कणखर बाणा
मराठी बोलण्याची लाज वाटते आम्हाला
घेऊन मरण खांध्यावरती जगतो येथे
जगणे जगून बघतो इथे आम्हाला
रोज मरे त्याला रोज कोण रडे
रोजचेच जगणे मरणप्राय आम्हाला
झगडतो रोज मरणाशी जगण्यासाठी
ओलीस ठेवले जगण्याने आम्हाला
बाजार मांडला जगण्याचा आम्ही
विकून टाकले मरणाने आम्हाला
गणित मांडतो जगण्याची आम्ही
शून्याने भागितले मरणाने आम्हाला

श्री प्रकाश साळवी दि 29 जून 2014