Author Topic: **बहिणीची भावासाठी कविता**  (Read 3189 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 231
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
बहिणीची आपल्या भावासाठी कविता.....

उगाच रोज भांडणारा,
तुच रे माझा वेडा सखा..
अरे वेड्या भाऊराया,
तुच रे माझा पाठीराखा..!!

नेहमी माझ्यावर ओरडणारा,
सतत माझ्यावर चिडणारा..
पण तितकंच प्रेम करणारा,
भाऊ! तुच रे माझा पाठीराखा..!!

राखीचा मान ठेऊन,
आवडती ओवाळणी टाकणारा..
तुच रे माझा रक्षणकर्ता,
भाऊ! तुच रे माझा पाठीराखा..!!

सर्वात अनमोल हिरा,
जणु माझा देवच तु खरा..
मला आशिर्वाद देणारा,
भाऊ! तुच रे माझा पाठीराखा..!!

उदंड आयुष्य लाभू दे तुला,
जन्मोजन्मी तुच भाऊ मिळू दे मला...
माझ्या मैत्रिणींचा पण लाडका सखा,
भाऊ! तुच रे माझा पाठीराखा...!!!

भाऊ! तुच रे माझा पाठीराखा...!!!
-
 प्रेमवेडा राजकुमार
9970679949