Author Topic: *दुष्काळग्रस्त पोशिंदा *  (Read 440 times)

Offline amolbarve

  • Newbie
  • *
  • Posts: 14
*माझी कविता*
*दुष्काळग्रस्त पोशिंदा *
आभाळ रूसल,आता मनही फाटलं
दोन थेंब मोत्यावाणी आता,डोळ्यामधीच आटलं
रानामधी जाऊ कसा ,आता रानही बाटल
दावणीत माझ पोर ,तहानभुकेन त्रासल
रीत झाल सुखाच भांड, त्यात दुखच साठल
भुक्या पोराला बघून, मायेच काळीज दाटल 
डोहीजड झाल रिन,तरी बळ मुठीत घेतलं
उभ राहण्यसाठी परी,आभाळ माझ्या डोळ्यात साठल