Author Topic: *उमलु द्या कळीला*  (Read 485 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
*उमलु द्या कळीला*
« on: November 23, 2014, 03:02:49 PM »
उमलु द्या कळीला
नको अशी तोडू
चला आपण अशी
मने-मने जोडू ॥1॥

फुलू द्या पाकळ्या
पसरु द्या सुवास
मुलगाच फक्त हवा
सोडा हा हव्यास ॥2॥

मुलगा कि मुलगी
नको शंका खोटी
आई फिरुनि जन्मेन मी
फक्त तुझ्याच पोटी ॥3॥

प्रत्येक गर्भपात करतेवेळी
आई एवढे सांग?
तु पण एक मुलगी आहेस
हे विसरलीस काय?॥4॥

हे कुठे थांबेल की
असेच चालू राहील
जन्मतील फक्त मुले अन्
त्यांना बायको बहीण नाही॥5॥
   -राजेश खाकरे
Mo :7875438494
Email: rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता