Author Topic: * लहानपण.....*  (Read 574 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
* लहानपण.....*
« on: July 14, 2015, 05:57:42 PM »
सदर विषय हा एका अतीगरीब लहान मुलीच्या वाटेला आलेल लहानपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे (काल्पनिक)

*** लहानपण ....***

लहानपण गेले निसटून माझे
लोकांची धुणी नी भांडी घासण्यात
शिळं पाकावर दिवस काढले
न मिळाले बालपण,बालपणात

दुखाने भरलेली होती ओजंळ
रस उरला नव्हता खेळण्यात
मोताद एक वेळच्या अन्नासाठी
न मिळाले बालपण,बालपणात

लहानपणीच हरवले पितृत्व
न दिले कुणी आधार जगण्यात
बालवयी वेळ आली अब्रुवर
न मिळाले बालपण,बालपणात

ना जगण्या भेटले लहानपण
ही सल उरली अंतकरणात
कसे उलघडू पान जीवनाचे
न मिळाले बालपण,बालपणात

रविंद्र कांबळे पुणे 9970291212
14/7/2015   वेळ 16:12

Marathi Kavita : मराठी कविता