Author Topic: ==* लाडकी बहीण माझी *==  (Read 712 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 358
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* लाडकी बहीण माझी *==
« on: August 27, 2015, 03:35:00 PM »
लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा --२--

जबाबदारी तुझ्यावर आहे भावा
विसरू नकोरे कर्तव्य तू तुझा
करायची रक्षा या बहिणीची सदा
राखीच्या दिसाला तू वचन हा दिला

रक्षा करावी बहिणीची या भावाने
हिमतीची आणली ती दोरी दोरी बघा --२--
लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा

नातं अतूटं असा बंध जीवनाचा
वाट पहावी सदा पर्व हा प्रेमाचा
श्वास संपावा तरी जो तुटेना
नातं हा असा बघा बहीण भावाचा

बहिणीने बांधीला राखीचा एक धागा
भावाने दिला आश्वासन रक्षणाचा --२--
लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा

बहिणीच्या ममतेची सावली असुदे
देवा तू तीला सदा सुखी राहुदे
वाटलंच तर काही सुखं मला तू कमी दे
तिच्या जीवनाला मात्र पूर्ण तू गती दे

मला जरी तू दिल्या धारा अश्रूच्या
बहिणीला मात्र माझ्या वारा दे सुखाचा --2--
लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा

लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा
----------********---------------

शशीकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी :- ९९७५९९५४५०
दि.२७/०८/२०१५

हे गीत Audio मध्ये ऐकण्याकरिता माझ्या उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांकावर Whats App द्वारे संपर्क साधावा,
संगीतबद्ध नाही परंतु चालीनिशी ऐकतांना नक्की आवडेल तुम्हाला.
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता