Author Topic: ==* आरक्षण *==  (Read 422 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 356
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* आरक्षण *==
« on: September 04, 2015, 11:47:03 AM »
आरक्षणाच्या नावाखाली पोळी शिजते
याचे त्याचे भले कुणाचे स्वार्थच दिसते
आम्हा हवा आरक्षण, होतो सारा हो हल्ला
गाढवांचा राज्य आता, कल्लाच कल्ला

           भोगाचे भोग नशीबी आता भोगत जावे
           बसवूनी खांद्यावरती भिजवून घ्यावे
           रडून तुमचे आता काही होणार नाही
           आली अंगावरती तर शिंगावर घ्यावे

दम आहे तर उभे होवुनी बघा दमाने
तुमचेच आहे राज्य व्हा तय्यार जोमाने
भिकाळ मांजरीवानी का दडून बसता
जागे व्हा आणि घ्या तो अधिकार हक्काने

           युवा शक्ती भाग्य बदलती वेळ आली
           जागे व्हा तुम्ही जागे व्हा पहाट झाली
           गप्प बसुनी भले कुणाचे झाले आहे
           हक्कासाठी उठा तरुणहो पहाट झाली

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी :- ९९७५९९५४५०
दि.०४/०९/२०१५
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता