Author Topic: ==* स्वातंत्र्य लिहा *==  (Read 309 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* स्वातंत्र्य लिहा *==
« on: September 08, 2015, 01:20:06 PM »
शब्दाने रंगलेली रांगोळी
उड़वा असत्याची गोंधळ
लोटला तो काळ सोसण्याचा
सज्ज करा लढाया लेखन

सत्य मांडा सत्यच पटवा
सर्वांच्या मनी बळ साठवा
वेळ आली आता जिंकण्याची
लेखनेची ती शक्ती दाखवा

काय घाबरायचं चोरांना
मुक्त करा अबोल मोरांना
बस झाली सहनक्षमता
लिहा गरीबांच्याच हक्कांना

आता हवा तो नवा स्वातंत्र्य
लेखनाची वापरूनी तंत्र
शब्द शब्द आता बोलतील
भारत माझा हा एकमंत्र

शशिकांत शांडीले(SD), नागपूर
दि.07/09/2015
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता