Author Topic: ==* पोळा *==  (Read 232 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 297
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* पोळा *==
« on: September 15, 2015, 11:06:53 AM »
तान्हं तान्हं बाळ माझं
आला तान्हा पोळा
घेऊन आनंद किती
आला हा सोहळा--2–

दोन कापडी नवी
नंदिहि नवा नवा
छोटुल्या चेहऱ्यावर
आनंद हवा हवा

त्याच्या सुखासाठी मी
करतो मरा मरा--2–
घेऊन आनंद किती
आला हा सोहळा

तान्हं तान्हं --------

मिरवन तो गावभर
घेऊन त्याचा नंदी
मिळल काहि पैसे
म्हणून तोहि आनंदी

त्याच्यासाठी करतो मी
गोळ शंकर पाळा
घेऊन आनंद किती
आला हा सोहळा

तान्हं तान्हं --------

दरवर्षी आतुरता
त्याला या सनाची
नवी कापड़ी अनं
नव्याचं नंदीची

आता मीही लागली
तयारीला पुढच्या
घेऊन आनंद किती
येतो हा सोहळा

तान्हं तान्हं बाळ माझं
झाला तान्हा पोळा
घेऊन आनंद किती
येतो हा सोहळा--2–
-----------------------***------------------------
शशिकांत शांडिले(SD), नागपूर
Mo.9975995450
दि.13/09/2015
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता

==* पोळा *==
« on: September 15, 2015, 11:06:53 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):