Author Topic: ==* जेल भरो *==  (Read 283 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* जेल भरो *==
« on: September 22, 2015, 02:55:54 PM »
जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो

तुमची होती सत्ता तेव्हां कुठं गेले होते
दुष्काळी भागातं तुम्ही भटकले का होते
हरवंली सत्ता म्हणून घेताय वाटतं सूड
तुमच्या राज्यातही तर हेच घडत होते

जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो

मराठवाडयाचं पानी तुम्ही बारामतीला दिलं
शेतकऱ्यांना मदत सोडून स्वहितच केलं
का नाही केली मदत मरत्या शेतकऱ्याला
आंदोलन म्हणून तुम्ही हे सोंगासनच केलं

जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो

सत्ता धरून तुम्ही केले आपलेच घर भरो
आता म्हणता गरीबासाठी सर्वच जेल भरो
स्वार्थ सत्तेचा फक्त तुम्ही मनी राखून ठेवता
तुमचं काय अडलं कुणी जगो कुणी मरो

जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो

आता तरी लाज बाड़गा करून पहा काहि बरं
दुखी गारिबांचं आता होऊ दया काहि भलं
तुम्ही रांगडे तेव्हा पोकले खाऊन खाऊनं सारं
गरीबाला जेउद्याना आता तरी पोट भरं

जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो
----------------****----------------
शशिकांत शांडिले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
दि. २२-०९-२०१५००
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता