Author Topic: मी - 3 Dec 1985  (Read 1082 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मी - 3 Dec 1985
« on: December 03, 2011, 12:15:54 AM »

मी - 3 Dec 1985


२६ वर्षापूर्वी या जगात आलो,
पृथ्वीतलावरच्या जनमाणसातला
मी पण एक झालो...इवल्याश्या डोळ्यांनी फक्त रंगाचे
धावणे हेरायचो तेव्हा...
त्या रंगातले मन आणि तन
आता कळतंय मोठा झालो जेव्हा...


सगळ्यांसाठी मी एक होतो
इवलासा असताना...
आता माझ्यासाठी ते सर्व
सगळंकाही आहेत...


गेल्या २६ वर्षात
सगळे जीवन जगलो,
कधी हरलो तर कधी जिंकलो,
कधी शहाण्यासारखा राहिलो
तर कधी वेड्यासारखा...


कधी कुणाचं मन दुखावून
गेलो असेल नकळतपणे...
कधी कुणाचा आधार बनलो
                                असेल अजाणतेपणे...          - हर्षद कुंभार


Marathi Kavita : मराठी कविता