Author Topic: 90 चा दूरदर्शन आणि आपण-  (Read 575 times)

Offline dhanaji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 91
90 चा दूरदर्शन आणि आपण-
« on: August 05, 2013, 07:25:42 PM »1. रविवारी सकाळी अंघोळ करून टीव्ही समोर बसायचो...
.
2. "रंगोली" मधल्या जुन्या नवीन गाण्यासाठी वाट
बघायची...
.
3. "जंगल-बुक" बघण्यासाठी सगळे मित्र
मंडळी घरी जमायची...
.
4. शक्तिमान बघण्यासाठी पळत पळत येऊन टीव्ही समोर
बसायचं...
.
5. रामायण-महाभारत चालू होताच घरातले सगळे एकत्र जमायचे...
.
6. "चंद्रकांता" पाट्या पासून शेवट पर्यंत बघायचं...
.
7. चंद्रकांता चा शेवट सस्पेन्स असायचा आणि आपण
आठवडाभर याचा विचार करत बसायचो...
.
8. शनिवार आणि रविवार च्या पिक्चर ची वाट बघत
बसायची...
.
9. कोण जर नेता मेला आणि नेहमीच्या सिरीयल
लागल्या नाहीत तर
त्या नेत्याला मनापासून शिव्या घालायच्या...
.
10. सचिन आउट झाल्यावर ब्याट-बॉल घेऊन गप बाहेर
खेळायला जायच...
.
11. "मूक-बधिर" समाचार लागलेकि त्यांची नक्कल
करायची...
.
12. हवने ऐन्टेना हलला तर त्याला छतावर जाऊन हलवत
बसायचं...
.
.
गेले ते दिवस... आता राहिल्या त्या फक्त आठवणीच..... ♥♥

-- Unknown
« Last Edit: August 05, 2013, 07:25:59 PM by dhanaji »

Marathi Kavita : मराठी कविता