Author Topic: B.E. झाल्यावर...  (Read 3009 times)

Offline Gaurav Patil

 • Jr. Member
 • **
 • Posts: 73
 • Gender: Male
 • अस्तित्वाला हजार नावे देतो... परी नाव ठेववत नाही.....
  • Gaurav's galaxy
B.E. झाल्यावर...
« on: August 21, 2011, 07:36:29 PM »
ही कविता मी सगळ्या engineers साठी लिहिली होती....खास करून माझ्या collegeच्या(Government College of Engg., Karad) मित्रांच्यासाठी....पण सगळ्यांनाच college संपल्यावर थोड्याफार फरकाने हेच अनुभव येतात....ह्या कवितेचं अजून एक वैशिष्ठ म्हणजे ही माझी पहीली  कविता होती आणि जी मी आयुष्यभर लक्षात ठेवेन....आणि हो ह्या कवितेत काही उल्लेख आमच्या college जवळच्या ठिकाणांचे आहेत....पण अशी ठिकाणे सगळ्यांच्याच college life मध्ये असतात....जसं की एखादं hotel किंवा टपरी किंवा एखादा  bar सुद्धा.....  ;)

"B.E. झाल्यावर..."

B.E. झाल्यावर सगळ्या मित्रांची ताटातूट होणार
कितीही लांब असलो तरी रोज phone मात्र असणार
पण हळूहळू तो phone call ही कमी होत जाणार
आधी रोज, मग आठवड्यातून एकदा आणि नंतर
फक्त birthdayच्याच दिवशी केला जाणार

phone केला की “कसा आहेस, काय करतोयेस?” विचारणा होणार
हुशार मुलांना job कसा चाललाय...आणि
आमच्यासारख्यांना job मिळाला का अशी चौकशी होणार
आणि पुण्यात असलो तर दर weekendला भेटायचे plan ठरणार

B.E. झाल्यावर...ह्या चालत्या-बोलत्या देहाचे machine होवून जाणार
पण त्या machineच्या hard disk मधेही BEच्या आठवणी असणार
कधी उघडलाच तो आठवणींचा folder की मित्रांना phone करावासा वाटणार
पण company bill भरते म्हणून सगळ्यांनी number बदलले असणार

टपरी वर एकटे चहा पिताना मित्रांची खूप आठवण येणार
मित्रांच्या बरोबर चहा पीतपीत केलेला दंगा आठवणार
(समजून घ्या चहा च्या ऐवजी काय म्हणायचे आहे ते) ;)
मग कपातल वादळ पोटात आणि मनातलं डोळ्यातून बाहेर येणार
पण तेवढ्यात bossचा phone येणार आणि
पुन्हा त्या पाणावलेल्या देहाचे machine होवून जाणार

B.E. झाल्यावर सगळ्यांचे खिसे फुगत जाणार
खिश्यांबरोबर पोटही थोडसं सुटत जाणार
companyमध्ये आठ तास bossला सांभाळणारा मग
लग्नानंतर घरच्या bossला सांभाळण्यात रमून जाणार

कधीकधी मात्र एकटे असल्यावर सर्वकाही आठवणार
DPतला चहा असो किंवा नानाची टपरी असो
महाराजाचं terrace असो किंवा निल्याची उधारी असो
अगदी कालच कराडात होतो इतकं सगळं ताजं असणार

मित्रहो हे दिवस पुन्हा नाहीत येणार
पुन्हा उरतील त्या फक्त आठवणी असणार
सोबत रडलेले क्षण आठवले की हसायला येणार
पण सोबत हसलेले क्षण आठवले की डोळ्यात टचकन पाणी येणार

-गौरव पाटील
http://gauravspatil.blogspot.com
« Last Edit: August 21, 2011, 07:40:12 PM by Gaurav Patil »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
Re: B.E. झाल्यावर...
« Reply #1 on: August 22, 2011, 09:49:55 PM »
गौरव ,
मस्त झाले कविता ....

Offline Gaurav Patil

 • Jr. Member
 • **
 • Posts: 73
 • Gender: Male
 • अस्तित्वाला हजार नावे देतो... परी नाव ठेववत नाही.....
  • Gaurav's galaxy
Re: B.E. झाल्यावर...
« Reply #2 on: August 22, 2011, 09:53:24 PM »
Thank u :) :)

Offline k.suhas

 • Newbie
 • *
 • Posts: 34
 • Gender: Male
 • Suhas Kakde
Re: B.E. झाल्यावर...
« Reply #3 on: August 23, 2011, 08:34:09 AM »
very nice :)
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: B.E. झाल्यावर...
« Reply #4 on: August 23, 2011, 11:08:38 AM »
college che divas khrach kiti vegle astat nahi. tya divsat je mahtwach ani jivan marnach vatat te moth zalya vr hsyaspd watat.

khrach te divas veglech astat........

Offline Saee

 • Jr. Member
 • **
 • Posts: 72
 • Gender: Female
 • Manakarnika
Re: B.E. झाल्यावर...
« Reply #5 on: August 23, 2011, 04:55:22 PM »
cool man... it was nostalgic... BE ch nahi tar kuthlya hi shakhet kuthlyahi college madhe hech sagla ghadta. kavita wachun apaplya matra mandalinchi athwan yeil nakki. farak asel to fakta tapshilat....


Offline Gaurav Patil

 • Jr. Member
 • **
 • Posts: 73
 • Gender: Male
 • अस्तित्वाला हजार नावे देतो... परी नाव ठेववत नाही.....
  • Gaurav's galaxy
Re: B.E. झाल्यावर...
« Reply #6 on: August 23, 2011, 05:10:31 PM »
@ Suhas, Kedar, Saee>> Thanks a lot  :) :)

mayuri purohit

 • Guest
Re: B.E. झाल्यावर...
« Reply #7 on: September 12, 2012, 11:41:08 AM »
khupch sundar kavita aahe .....ani mi pn govt,polytechnic karadlach shikleli aaahe........

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: B.E. झाल्यावर...
« Reply #8 on: September 12, 2012, 02:40:57 PM »
good manapasun lihli,aavadli.

Offline sanit

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: B.E. झाल्यावर...
« Reply #9 on: September 22, 2012, 08:41:09 PM »
mast lay bhari mitra

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक पाच किती ? (answer in English number):