Author Topic: डायरी...Diary...  (Read 2239 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
डायरी...Diary...
« on: December 23, 2012, 01:09:48 AM »
वर्षाच्या शेवटी Diary हा एक मोठा विषय असतो...
आपल्याला सर्वात चांगली Diary मिळावी...
म्हणून प्रत्येक जण धडपडत असतो...
वर्षाच्या शेवटी Diary हा एक मोठा विषय असतो...!!१!!

कोणाला छोटी तर कोणाला मोठी आवडते...
कोणाला बारीक तर कोणाला जाडी आवडते...
जोडीदार शोधतानाही जेवढा त्रास घेतला जात नाही...
त्याहून जास्त त्रास Diary शोधताना प्रत्येक जण घेत असतो...
वर्षाच्या शेवटी Diary हा एक मोठा विषय असतो...!!२!!

Diary शोधता शोधता मग नवीन वर्ष उजाडते...
वर्षाची सुरवात मग Diary शीवायचं जाते...
प्रत्येक वर्षी वेळ असूनही काही जणांना
मुद्दामुनच वेळ घालवायचा असतो...
वर्षाच्या शेवटी Diary हा एक मोठा विषय असतो...!!३!!

Diary तर घेतली जाते संकल्प तर सोडले जातात...
पहिली तीन पाने सोडली तर...
तीनशे बासष्ट पाने तशीच राहतात...
मग काय त्या पानांसारखा...
Diaryचा ही अंतच होत असतो...
वर्षाच्या शेवटी Diary हा एक मोठा विषय असतो...!!४!!

काही जाण Diary रोजच्या साठी लिहितात...
काही आठवणी आणि कविता लिहून पानेच पानेच भरतात...
काही जणांसाठी Diary मात्र त्यांच्या मनाचाच आरसा असतो
वर्षाच्या शेवटी Diary हा एक मोठा विषय असतो...!!५!!

Diaryला सर्वकाही माहित असते...
असे एक गुपित जे कोणालाही माहित नाही
तेही Diaryला ठाऊक असते...
म्हणून जणूकाही एक खजिनाच सांभाळावा
तसा Diaryचा सांभाळ होत असतो...
वर्षाच्या शेवटी Diary हा एक मोठा विषय असतो...!!६!!

आता हळूहळू पानांची Diary मागे पडतेय
तिची जागा आता E-Diary घेतेय
E-Diary म्हणजे तीच
जिला कोणी Notebook तर कोणी Tab म्हणत असतो
वर्षाच्या शेवटी Diary हा एक मोठा विषय असतो...!!७!!

मला मात्र Diary आवडते मी रोज नेमाने Diary लिहितो
आणि मग रोज Diary वाचता वाचता
माझ्या सुंदर भूतकाळात शिरतो
वर्षाच्या शेवटी Diary हा एक मोठा विषय असतो...!!८!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush
« Last Edit: December 24, 2012, 11:17:06 AM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Jayesh Patil

 • Guest
Re: डायरी...Diary...
« Reply #1 on: December 24, 2012, 11:12:26 AM »
Sundar kavita ahe ani tihi Diary sarkhya vishayavar. Chan prayatna ..

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: डायरी...Diary...
« Reply #2 on: December 24, 2012, 01:02:34 PM »
ha ha ha .... chan kavita
 
डायरी नवीन वर्षाची
आठवण करून देते
एक वर्ष संपल्याची
नवीन वर्ष सुरु झाल्याची

डायरी नवीन वर्षाची
आठवण करून देते
रोज काहीतरी लिहिण्याच्या निश्चयाची
जुन्या डायरीतल्या कोर्या पानांची 
« Last Edit: December 24, 2012, 01:19:07 PM by केदार मेहेंदळे »

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: डायरी...Diary...
« Reply #3 on: December 25, 2012, 12:25:31 AM »
good one

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: डायरी...Diary...
« Reply #4 on: December 25, 2012, 10:48:39 AM »
Kedar sir, Amoul...
... Khup abhar manapasun.

Amol Shinde

 • Guest
Re: डायरी...Diary...
« Reply #5 on: December 26, 2012, 11:52:22 AM »
Dear sir,

I like ur poem.

Thanks Regards,
Amol Shinde :) :) :)


Amol Shinde

 • Guest
Re: डायरी...Diary...
« Reply #6 on: December 26, 2012, 11:54:03 AM »
Dear Sir,

I Like ur Poem

Thanks & Regards,
Amol Shinde

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: डायरी...Diary...
« Reply #7 on: December 26, 2012, 01:05:22 PM »
apratim prajunkushji...
kharach dairy sarkhya vishyavarchi suddha kavita vachayla milna khup changla aahe...
khupch chan..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: डायरी...Diary...
« Reply #8 on: December 27, 2012, 12:03:28 PM »
chan

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: डायरी...Diary...
« Reply #9 on: December 28, 2012, 12:58:39 AM »
Amol, Shrikant ji, Prasad ji...
... Khup abhar agadi manapasu.

Regards...
Prajunkush...