Author Topic: Diplomats(डिप्लोमा करून डिग्रीला गेलेले)  (Read 866 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...

KIT90 च्या  production च्या ब्याचला होते, diplomats आठ.
इतरही दोघे त्यांना सामील होते , ही होती खास बात.
 
प्रत्येकाची होती जगावेगळी तऱ्हा.
खाली वाचून पाहून तुम्हीच काय ते ठरवा.
 
बालींगेच्या गिऱ्याची  होती,  एक टोपी  अन एक TVs 50.
पहिले सहा महिने होती, त्याची सर्वांशीच कट्टी.
 
रत्नागिरीच्या जीवण्याचे होते, मोजून मित्र आठ.
मेसपासून कॉलेज पर्यंत मैत्रिणी होत्या मात्र, सतराशे साठ.
 
वॉलचंदनगरचा  पश्या असे, कॉलेज मध्ये कमी, आणि आजारीच फार.
trecking  च्या गप्पा मात्र , मारी भारंभार.
 
इशावाश्यमच्या जयद्याची, होती बातच न्यारी.
सुध्या - बाळ्या मारीत त्याच्या ,लुनाची एक -एक फेरी.
 
बारामतीच्या हर्षाच काम कमी, अन जयद्या सोबत लचकनच फार.
नेहरूनगरच्या  सुज्याशी , त्याची जुंपे सदा सर्व काळ.
 
केनवडेच्या बाळ्याच्या  बडबडीला, गोंगाटाची धार.
देवर्डेच्या बधीर सुध्याचा होता, मेंदू गारे – गार.
 
रेल्वे फाटक वाल्या सुन्याची, होती तोंडभर दाढी.
सुज्याच्या साथीने सर्वांच्या, सदा खोडया काढी.

नेहरुनगरवाल्या सुज्याचा, बंगला होता पॉश.
लांबवर पोहोचताना, सोसावा लागे, कातडी चपलांचा वास.
 
शास्त्री नगरच्या जाड्या अंद्याच्या चालत, सदा वेगवेगळ्या स्टोऱ्या.
content कमी पण हसणच खुप , कळत मात्र होत्या, थोड्या – थोड्या.
 
असे होते दहाजण ,वेगळे आणि खास.
अलग अलग होते पण ,होता सर्वांचा एकच श्वास.
 
आता थांबवतो, उडवायची खिल्ली, अन मागतो सर्वांची क्षमा.
आणि लवकरच सर्वजन, कुठेतरी एका ठिकाणी जमा.
 
कवी : बाळासाहेब तानवडे

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):