ॐ साईं.
II दत्त नाम.II© चारुदत्त अघोर.(१७/९/११)
श्वासले मी श्वास किती रे,
नाही कशात कुठलाच राम,
किती मोजले क्षण जीवनी,
नाही एकास,कसलाच दाम;
थकलो आता देही घेउनी ,
कीर्ती,ऐश्वर्य,चैन,आराम,
उरवी रे मज मुखी आता,
दत्त नाम, दत्त नाम.II
किती रे परति फेरे घ्यायचे,
उर्वरित सांडून,कर्म काम,
दाखवी रे दिगंबरा आता,
मला तुझा मुक्ती धाम;
ध्यास लावी फक्त तुझा,
जगी स्थळी तुझेच नाम,
उरवी रे मज मुखी आता,
दत्त नाम, दत्त नाम.II
कर्म कांड करुनी थकलो,
कोण कडी तू,सरळी कि वाम,
पदी,अभंगी तुज आळविता,
भूलवीशी रे,नश्वरी काम;
भरकटता जगी कधी मी;
ओढीशी लावूनी मज लगाम,
उरवी रे मज मुखी आता,
दत्त नाम, दत्त नाम.II
घेई मज चरणी तुझिया,
तूच राम रे,तूच शाम,
किती गाळीशी,अश्रू माझे,
देह तपवूनी,वाहीशी घाम;
नको रे अंत पाहू आता ,
देई जीवास,पूर्ण विराम;
उरवी रे मज मुखी आता,
दत्त नाम, दत्त नाम.II
चारुदत्त अघोर.(१७/९/११)