II गुढी पाडवा II
----------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकूया या पवित्र सणाच्या काही कविता.
"गुढीपाडवा"
------------
आला गुढीपाडवा आला
नव वर्ष साजरा करू चला
नव संकल्प करू चला
आला गुढीपाडवा आला ।।१।।
नव विचारांची गुढी उभारू चला
दिवस हा भाग्यदायी आला
तोरण दारी लावू चला
आला गुढीपाडवा आला ।।२।।
ढोल ताशांच्या गजरात
नव वर्षाचे भक्ती भावात
स्वागत करू गजरात
आला गुढीपाडवा आला ।।३।।
--सनी आडेकर
--------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
-----------------------------------------
------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================