Author Topic: kaqvita  (Read 425 times)

Offline prakashredgaonkar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
kaqvita
« on: April 14, 2015, 08:16:25 AM »
तुझ्या शिवाय मी जगून घेईन म्हणतो

तू निघून गेलीस दूरदेशी
मग सांग  बघू मी काय करायचं...?
प्रत्येक दिवस टाहो फोडून रडतो
ते  फक्त बघत बसायचं...?

 तू होतीस तेव्हा
सगळे दिवस किती छान होते
प्रत्येक दिवसाचे
कसे एक गाणे होते

प्रत्येक दिवस
माझ्यासाठी फक्त
तुझे माझे  होते
ए  फ़ोर APPLE  बी फॉर बॉल
सी फॉर क्याट
आनंदाचे होते
डी फॉर डॉल  म्हणता म्हणता
तू  निघून गेलीस

पुढचे काही शिकवशील
तर तू परदेशी झालीस
[छान नवरा मिळालाय असे ऐकून आहे
कानावर आले
तू नव्याने जगणे  शिकली आहेस ]
आता
डी फॉर डॉल  नंतरचे काहीच येत नाही
एल फॉर  लव्ह पर्यंत तर
तू तरबेज  आहेस

माझ्यासाठी 
एल फॉर लव्ह तर फार लांब होते
तिथपर्यंत पोहचणे
माझ्यासाठी अवघड होते   
तहानल्या पोरासारखा
अजून मी तहानलेला असतो
कोरड घशाला पडते
म्हणजे काय असते
हे तुला कळलेच  नाही

गेलीस तर गेलीस
आता तुझ्या शिवाय मी जगेन म्हणतो
चिमणीला मी फ्रेंड करीन
कावळ्याला दोस्त
माझ्या नजरेतून
ह्या पाखरांना  चेहराच नसतो
दररोज सकाळी बसणारे पाखरू
मला नव्याने भेटत असते 
आणी शप्पत
ते माझ्यासाठी छानच असते

एखादे पाखरू निघून गेले तर
मला मुळीच कळत  नाही
खिडकीवर बसणारे
प्रत्येक  पाखरू
आता मला माझेच वाटते

तू नाहीस तरी आता
तुझ्याशिवाय जगून घेईन म्हणतो
तरी अजूनही चुकून
खिडकीवरच्या पाखरात
मी तुलाच बघत बसतो …।

प्रकाश 

Marathi Kavita : मराठी कविता


Aju

  • Guest
Re: kaqvita
« Reply #1 on: May 03, 2015, 11:43:49 AM »
Chanach....