तरूणाई
काळोख्या रात्री एका, जेव्हां अंधार बोचू लागला
उजाड़ झालेल्या मातीचा, हुंकार येऊ लागला
उसळणार्या लाटा, पाषाण भिंतीवर थडकू लागल्या
बलिदानाच्या ज्वाळा, आकाशाला भिडू लागल्या
आक्रोश, फुटक्या काचा, पोरकी आयुष्ये साचू लागली
रिकामी कूस, आता तिला भरीस जाचू लागली
त्या रात्री, रक्ताळलेल्या डोळयांनी जगाने पाहिलेलं
हे तरूणाईचं स्वप्नं, आशेच्या पहाटे उमललेलं