उन्च उन्च इमारतीन्तुन्..
वाट काढत चन्द्र येतो.
हळूच एक शुभ्र कवडसा..
खिडकीतुन मला देतो.
सोबत एक फ़ुन्कर..
गार गार वार्याची..
आणि ढगान्तुन लुकलुकनारी
चमकती आरास तार्यान्ची..
चन्द्रकोरीच्या परिघातुन..
वाकुल्या दाखवते चान्दणी..
चन्द्राच्या कुशीत चान्दणे पान्घरुन
हसुन निजते चान्दणी..
माझ्यापाशी असतात फक्त..
रेन्गाळ्नारे त्यान्चे कवड्से..
जपलेत मी जसे..
तुझ्या आठवनीन्चे ठसे..
चन्द्रही आलेला असतो..
निरोप तुझा द्यायला..
मला देउन काही, पुन्हा..
कवडसे तुझ्यासाठी न्यायला..
श्वास माझे गुम्फुन मी..
कवडसे त्याला परत देतो..
मी दाखवलेल्या वाकुल्याही,
हसतच तो परत घेतो..
मग तो परत निघतो..
इमारतीन्तुन फिरायला..
कवडसे वाटत पुन्हा,
खिडकीत तुझ्या शिरायला....
By Abhinav