Author Topic: जीवन आणि विचार  (Read 844 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
जीवन आणि विचार
« on: November 18, 2012, 01:16:36 AM »
जीवन आणि विचार
ह्यात फार फरक असतो
एक कटुसत्य असते
दुसरा फक्त आभास असतो ।
जीवनाचा सारा ओघ
दहाही दिशा धावत असतो
विचारांचा अतिवेग मात्र
फक्त एका दिशेस असतो ।
जीवनाला वर्तमान तसा
भविष्य अन भूतकाळ असतो
विचार मात्र कोणत्याही
काळाच्या बंधनात नसतो
जीवन कटुसत्य असते
विचार फक्त आभास असतो
म्हणूनच दोहो मध्ये
जमिन आस्मानाचा फरक असतो ।। रविंद्र बेंद्रे

Please click here to listen
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_12.html
« Last Edit: November 18, 2012, 01:18:11 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता