Author Topic: बाळासाहेब एक महात्मा  (Read 637 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
बाळासाहेब एक महात्मा
« on: November 20, 2012, 08:56:59 AM »तहानभूक हरपून
लाखोंच्या संख्येने
मानसं धावत सुटली
फक्त तुम्हाला
शेवटचं नजरेत साठवण्यासाठी ....
दूर दुरून आलीत ती
प्रवास करून
आपल्या जीवाची पर्वा न करता
फक्त तुम्हाला
शेवटचं भेटण्यासाठी.....
असं उगीच कुणी कुणासाठी
तहानभूक विसरून
कां बंर येईलं
स्वप्नातही वाटलं नव्हत
असं कधी घडून जाईल....
न लाखोंच्या घरात मानसं असतांनाही
एक निरव शांतता
डोळ्यात अश्रू डबडबलेले
फक्त एकच ईच्छा
तुम्हाला पाहण्याची
तेही तुमचं कुठलही भाषण नसतांना
तुम्ही संवाद करू शकत नाही
याची पूर्ण जाणीव असतांना.... 
अशी कुठली भुरळ
पाडली होती तुम्ही
या आलेल्या प्रत्येक माणसावर
कि सुनसान झाले रस्तेही
गल्लीतल्या नाक्यानाक्यावर .....
न तेथे फक्त शिवसैनिक नव्हता
सामान्य माणसासोबत
तुमचा कट्टर विरोधकही होता
न तेथे न येताही
घराघरात सुतकी चेहरा करून
टी . व्ही . समोर बसलेला
एक सामान्य माणूसच होता ....
एवढा मोठा जनसमुदाय
उगीच नाही जागा देत
असा कुणालाही आपल्या हृदयात
मान्य केलंय जगानं
बाळासाहेब माणूस असला तरी
एक महात्मा होता .

                                   हिन्दुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
                                                         संजय एम निकुंभ , वसई
                                                      दि. २०.११.१२ वेळ : ८.०० स.
 
 
« Last Edit: November 22, 2012, 10:50:19 PM by SANJAY M NIKUMBH »

Marathi Kavita : मराठी कविता