Author Topic: दार खिडक्या गच्च लावून  (Read 1345 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
दार खिडक्या गच्च लावून
« on: November 23, 2012, 08:07:02 PM »
दार खिडक्या गच्च लावून
जाड पडदे वरती ओढून
मी बसतो ए. सी.लावून
बाहेर असो कितीही उन 

बाहेर खूप कोलाहल आहे
कुठला मोर्चा चालला आहे
पोलिसांची गाडी आणि
सायरन वाजवत आली आहे

कुठेतरी काचा तुटणार
अन् कुणाचे डोके फुटणार 
उद्या पण सारे काही
पेपर मध्ये छापून येणार 

निवांतपणे सारे वाचू
आता एक झोप घेऊ    
फार उत्सुकता ताणली तर
चॅनल थोडे बदलून पाहू

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

« Last Edit: November 23, 2012, 08:08:16 PM by विक्रांत »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दार खिडक्या गच्च लावून
« Reply #1 on: November 26, 2012, 01:13:35 PM »
pandharpeshya mansaach yathochit varnan...

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: दार खिडक्या गच्च लावून
« Reply #2 on: November 30, 2012, 02:17:48 PM »
होय ,धन्यवाद केदार .