Author Topic: घर म्हणजे...?  (Read 1690 times)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
घर म्हणजे...?
« on: November 28, 2012, 09:28:43 PM »
घर म्हणजे काय असतं...?
चार भिंतींचा आधार,
एका दरवाजाचे मन,
दोन खिडक्यांचा प्रवास,
एका छताचा विश्वास...
 
घर म्हणजे...?
पैशांचा डोंगर,
भावनांचा वणवा,
विचारांचे  श्वापद,
की स्वप्नांचे रान...
 
घर म्हणजे...?
मातीच्या चुली,
भुकेचा जोगवा,
शेणाची ओसरी,
आणि अंधारा जागर...
 
घर म्हणजे...?
मतांचे भांडण,
प्रेमाचा घात,
अनामिक नाती
अन एकट्याची पाऊलवाट...
 
- रुद्र

Marathi Kavita : मराठी कविता


nitin tanawade

 • Guest
Re: घर म्हणजे...?
« Reply #1 on: November 29, 2012, 03:45:38 AM »
मतांचे भांडण.... प्रेमाचा घातं... अनामिक नाती... अन एकट्याची वाट... मस्तचं

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: घर म्हणजे...?
« Reply #2 on: November 29, 2012, 05:26:01 PM »
kavita chaan aahe.... pan ashich positive baju hi lihita yeil.... praytn kara