Author Topic: लिपस्टिकच्या ओठांवर ...  (Read 5034 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
लिपस्टिकच्या ओठांवर ...
« on: December 03, 2012, 12:47:36 PM »
लिपस्टिकच्या ओठांवर ...

लिपस्टिकच्या ओठांवर
मी नजर खिळवून बसतो
पावडर परफ्युम च्या वासांत
भान माझे हरवून बसतो।
साडी अन ब्लाऊजपेक्षा
स्कर्ट्स मी पसंत करतो
त्याही पेक्षा मिनी-फ्रॉकने
खरोखर भारावून जातो ।
कुंतलाच्या वेण्यांपेक्षा
अवखळ बटा पसंत करतो
लाजर्या नजरेपेक्षां
मिटला डोळां पसंत करतो ।
गजगती चालीपेक्षां
चवड्यावरील चाल बघतो
हृदयांतील सौंदर्या पेक्षां
त्यावरील आवरण बघतो ।
कारण ह्याच सार्यामुळे
माझ्यातील मानव मरतो
अन आजकल मान्यवर
तिथे फक्त सैतान उरतो ।।

रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_28.html

Marathi Kavita : मराठी कविता