Author Topic: कविता करणे हेच खुप अवघड असते....  (Read 562 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
आधी असे वाटायचे...

कविता लिहिण्यापेक्षा
कविता वाचणे खुप अवघड असते...

त्या वाचता वाचता
भावनांचा समतोल राखणे खुप अवघड असते...

भावनांचा समतोल राखता राखता
समोरच्याचा विचार करणे खुप अवघड असते...

समोरच्याचा विचार करता करता
त्यांच्यापासून लांब राहणे खुप अवघड असते...

त्यांच्या पासून लाबं राहता राहता
त्यांच्याशी न बोलणे खुप अवघड असते...

त्यांच्याशी न बोलता बोलता
प्रेमात न पडणे खुप अवघड असते...

प्रेमात न पडता पडता
दूर जाणे खुप अवघड असते...

दूर न जाता जाता
एकटे राहणे खुप अवघड असते...

एकटे राहता राहता
जीवन जगणे खुप अवघड असते....

पण एकंदर आता असे वाटते की...
कविता करणे हेच खुप अवघड असते....
कविता करणे हेच खुप अवघड असते....

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
ha ha ha