Author Topic: खून झालाय कोणाच्या तरी हाताने...  (Read 656 times)

Offline tanmay20

 • Newbie
 • *
 • Posts: 9
छडी उचलली बाईने , म्हणाली लिहा कविता डोक्याने
निळा आंबा पांढरा पेरू खाऊन पोट भरिले , असं लिहिलं बोक्याने
हे ऐकून सारे हसले , म्हणाले काय लिहिले हे मुर्खाने
“ अरे मुर्खा , आंबा हा पिवळाच पेरू हे हिरवंच ”  म्हणाली बाई रागाने
“ का ? हे असंच का ? तसं का नाही ? ” विचारलं त्याने हट्टाने
म्हणाल्या बाई , “ हे असंच लिहिलंस , तरच पास होशील चांगल्या मार्काने ”
खरं तर त्यादिवशी कल्पनाशक्तीचा खून झाला , कोणाच्या तरी हाताने .....


ब्रश उचलला सरांनी , म्हणाले काढा चित्र मनाने
त्रिकोणी सूर्य , उडणारे मासे , सहा पायी हत्ती , मस्त सृष्टी रंगवली बोक्याने
हे बघून सारे हसले , म्हणाले पुन्हा माती खाल्ली ह्या मुर्खाने
“ अरे बावळट , सूर्य गोलंच , मासे पाण्यातच , हत्तीला चारच पाय ”  म्हणाले सर द्वेषाने
“ कोणी सांगितला ? माझ्या चित्रात हे असंच ”  म्हणाला बोक्या जिद्दीने
मग काय ? हात पुढे करताच बसले दोन फटके सरांच्या पट्टीने
खरं तर , त्या दिवशी पुन्हा कल्पनाशक्तीचा खून झाला , कोणाच्या तरी हाताने .....

वीस वर्षांनी सर आणि बाई , अचानक भेटले जात असता रस्त्याने
“ अरे बोक्या तू ? काय चाललंय सध्या ? ” विचारलं त्यांनी आपुलकीने
“ काय चालणार ? तीच पाच हजारची नोकरी , तेच चाळीतलं घर
तोच लोकलच्या चौथ्या सीट वर बसून प्रवास ”  म्हणाला बोक्या खजीलपणे
“ अरे अरे अरे ! काय हे बोक्या ? काय चाललंय हे ?
थिंक औट ऑफ द बॉक्स , वापर कल्पनाशक्ती , आणि मार भरारी आयुष्यात ”  म्हणाली बाई उत्साहाने
बोक्याच्या डोळ्यात अश्रू तरळले , हृदय भरून आले , केविलवाणे शब्द फुटले
“ वापरली असती बाई , खरंच वापरली असती, पण त्याच गोष्टीचा तर खून झालाय कोणाच्या तरी हाताने .....खून झालाय कोणाच्या तरी हाताने ”.

                                                                                                                                                                             .......तन्मय सिंगासने

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
chan.... far chan

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
मला वाटते पहिल्या दोन कडव्यात  कविता संपायला हवी होती .३ रे कडवे ओढल्या सारखे वाटते .दोन सुंदर निळे आंबे खाल्यावर नेहमीचा रटाळ पिवळा तिसरा आंबा ... :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Nice try. Better luck next time. :)