Author Topic: मित्र भेटावा तसे  (Read 725 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
मित्र भेटावा तसे
« on: December 15, 2012, 12:49:30 AM »
मित्र भेटावा तसे
एक पुस्तक भेटले
जागे करून गेले
पुन्हा एकदा  ll १ ll
हृदयाच्या आत
घालीत हात
विझणारी वात
तेजाळली    ll २ ll
मरू मरू गेलेला
विश्वास जागवला
प्रकाशाचा लागला 
वेध पुन्हा  ll ३ll
कृणाईत त्या मी
जागल्या क्षणांचा
उघड्या डोळ्यांचा
झालो आज ll ४ ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता