Author Topic: प्रवासात ...................  (Read 745 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
प्रवासात ...................
« on: December 20, 2012, 07:29:00 AM »
प्रवासात ...................

 सकाळी सकाळी तोंडात
 गुटखा न बार कोंबून
 किडक्या दातांसह
 जोरजोरात खिद्ळून
 अपशब्द न घाणेरडे हावभाव
 बरेच जण करत असतात
 त्यानंच स्टेशन दूर असूनही
 दारात लोंबकळत रहातात
 नेहमीचे सहप्रवाशी वा मित्र असूनही
 आई बहिणी वरून शिव्या हासडतात
 त्यातले काही माकडं पोरींना पाहून
 हातवारे न अचकट विचकट बोलतात
 किडके दात न बसलेली छाती
 हे बेढब दिसणं त्यांच्या गावी नसतं
 फक्त पुरुष म्हणून जन्मले या गर्वान
 त्याचं मन बेभान वागत असतं
 फुंकर मारून उडून जातील
 अशी त्यांची देहयष्टी असते
 फक्त टोळक्यान वावरत असल्यानं
 त्यांच्या अंगात हि मस्ती असते
 सकाळी सकाळी उत्साहाचा वारा होऊन
 जगण्यासाठी बाहेर पडलेला मी
 रेल्वेच्या डब्यात चढल्यावर
 हे बघून गप्प होऊन जातो
 न गाडीतल्या पुरुषांचा
 असा पुरुषार्थ पाहून सुन्न होऊन जातो
 कसा असेलं उद्याचा भारत
 या जाणिवेन व्यथित होऊन जातो
 तारुण्याची ताकद अशी वाया चालल्यान
 मी नकळत दु:खी होऊन जातो
 त्याच गर्दीत भजनांचे सूर
 माझ्या कानावर पडतात
 अंधुकशा आशेची किरणं
 त्या सूरातून मला दिसतात .

 संजय एम निकुंभ , वसई
 दि. १८.१२.१२ वेळ : ८.०० स.
 { मिरारोड ठाणे बसमध्ये }

Marathi Kavita : मराठी कविता