Author Topic: मनाची जडण घडण  (Read 785 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
मनाची जडण घडण
« on: December 20, 2012, 07:35:32 AM »
मनाची जडण घडण

 कुंभाराच्या मडक्या सारखं
 मनाला घडवावं लागतं
 चांगल वाईट काय
 पारखून घ्यावं लागतं

 काय हवं काय नको
 जपून ठरवावं लागतं
 आजूबाजूस मोह सारे
 त्यांना टाळाव लागतं

 मनाचे डोळे उघडे ठेवून
 या जगात वावरावं लागतं
 जगाच खर रंग रूप
 ओळखून नीट वागावं लागतं

 खऱ्या न खोट्या चेहऱ्यांना
 रोज सामोरं जावं लागतं
 जरी फसगत झाली तरी
 स्वताला सावरावं लागतं

 किती उच्च शिखर गाठतो माणूस
 त्यास काहीच अशक्य नसतं
 पण मनाला घडवणं
 हे कर्म खूप कठीण असतं

 माणसाचा जन्म भेटल्यावर
 त्याचं सार्थक करायचं असतं
 पण मनास कसं वळणं लावतो
 त्यावर सगळं अवलंबून असतं .

 संजय एम निकुंभ , वसई
 दि . १८.१२.१२ वेळ : ७.५० स.

Marathi Kavita : मराठी कविता