Author Topic: जीवन एक कोडे आहे ...  (Read 804 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
जीवन एक कोडे आहे ...
« on: December 28, 2012, 12:43:24 PM »
जीवन एक कोडे आहे
      न सुटणारे न उलगडणारे ।
जीवन एक फूल आहे
    दुःख स्पर्शाने मलूल होणारे ।
जीवन हे धूप आहे
   क्षणा क्षणाला कणा कणाने झिजणारे ।
जीवन हे मेण आहे
  कष्टाच्या आचेने वितळणारे ।
जीवन हे प्रेम आहे
    क्षण भंगूर -ठरणारे ।
व्यवहाराची झळ लागताच
    विरघळून -विरून जाणारे ।
जीवन हे स्वप्न आहे
   कधी साकार न होणारे ।
जाग येतांच विरून जाउन
   नेत्रांची जळजळ करणारे  ।
जीवन हे आभाळ आहे
  कधीं गवसणी न बसणारे ।
क्षितीजासारखे कायम
               दूर दूर पळणारे ।
रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_22.html
« Last Edit: December 28, 2012, 12:44:07 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: जीवन एक कोडे आहे ...
« Reply #1 on: December 28, 2012, 01:36:46 PM »
रवींद्र जी,
तुमची कविता आवडली.
 
तुमच्या ह्या कविते वरून स्पुर्ती घेऊन सुचलेली  जीवन एक गाणे कविता (थोडी positive) प्रेरानादाई कवितेत पोस्ट केली आहे. तुमचा अभिप्राय आपेक्षित आहे.