Author Topic: ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता  (Read 882 times)

Offline GANESH911

  • Jr. Member
  • **
  • Posts: 124
  • Gender: Male
  • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकलेली किरणे हा सुर्य सोडवित होता

तशी सांज आमच्या दारी येऊन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातुन शब्द वगळता

ती आई होती म्हणुन घनव्याकुळ मी ही रडलो होतो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवरती धुरकट तेव्हा कंदिल एकटा होता

हे रक्त वाढतांना ही मज आता गहीवर नाही
वस्त्रात द्रोपदीच्याही तो कृष्ण नागडा होता

कविवर्य ग्रेस