Author Topic: खरचं देव असता तर .................  (Read 819 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
खरचं देव असता तर .................
« on: January 14, 2013, 03:01:20 PM »
खरचं देव असता तर .................

 खरचं देव असता तर
 किती बरं झालं असतं
 ज्याच्या त्याच्या कर्माच
 फळ त्यानं दिलं असतं

 वाईट कर्म करण्याआधीच
 त्यानं कुणासही रोखलं असतं
 विनाकारण कुणाचं जीवन
 बरबाद झालं नसतं

 डोळ्यावर पट्टी बांधून
 जशी न्यायदेवता उभी असते
 तसं त्याच्या राज्यात
 कधीच झालं नसतं

 तत्काळ न्याय मिळाला असता
 भिजत घोंगड पडलं नसतं
 वर्षनुवर्ष खटले चालून
 पाप मोकाट सुटलं नसतं

 शिक्षा मिळणार या भितीन
 माणसाचं श्वापद झालं नसतं
 माणसातलं जनावर मरून
 माणूसपण माणसात आलं असतं

 वेगवेगळ्या जाती -धर्मांच
 असं स्तोम माजलं नसतं
 माणूस माणसाचा झाला असता
 या धरतीला कुणी नरक केलं नसतं .

 संजय एम निकुंभ , वसई
 दि. ३०.१२.२०१२ वेळ : ७.३० सं .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: खरचं देव असता तर .................
« Reply #1 on: January 14, 2013, 03:52:23 PM »
far marmik lihil aahet sanjay ji