Author Topic: अदला बदली हृदयाची  (Read 600 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
अदला बदली हृदयाची
« on: January 18, 2013, 09:48:28 AM »
अदला बदली हृदयाची
  ही काहीं चांगली नाहीं
समाजाला अन शास्त्राला
  ती काहीं मान्य नाहीं
हृदय देऊन टाकल्यावर
  कार्डीओग्रॅम कसा निघेल !
हार्टअटिक आल्यावर
  औषध पाणी कसे मिळेल
परकी वस्तु न घेण्याची
  शरीराची रीत आहे
तरी सुद्धां ह्या जगांत
  हृदयाचा व्यापार होत आहे   
हृदयाची अदला बदल
  फार धोकादायक आहे
त्याने आचार विचारांत
  खूपच फरक पडणार आहे
'सयामी 'हृदय' तर
  फार घातक ठरणार आहे
छातीतील पोकळी ही
  मृत्युस आमंत्रण देणार आहे
हे सारे माहित असुन
  तिकडे दुर्लक्ष करीत आहेत
हृदयाच्या ह्या व्यापाराने
  सारे झपाटले गेले आहेत 

रविन्द्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this

http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_7.html

Marathi Kavita : मराठी कविता