Author Topic: असा कसा तू माणूस ......  (Read 1256 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
असा कसा तू माणूस ......
« on: January 19, 2013, 06:41:22 AM »
असा कसा तू माणूस ......कथनी वेगळी

अन करणी वेगळी

असा कसा तू माणूस

भाव वेगळा

रंग वेगळा

असा कसा तू माणूस 

शब्द तुझे

तू न पाळी

असा कसा तू माणूस 

माणसालाही

जिवंत जाळी

असा कसा तू माणूस 

सरड्या सारखे

रंग बदलतो

असा कसा तू माणूस 

खोटे वागून

कुणाही फसवतो

असा कसा तू माणूस 

भक्ती देवाची

वर्तणूक राक्षसी

असा कसा तू माणूस 

स्वतःच्या आत्म्यास

न ओळखशी

असा कसा तू माणूस 

उंबरठ्यावर मरण तरी

सुटे ना हाव

असा कसा तू माणूस 

वाईट कर्म करूनही

म्हणे देवा पाव

असा कसा तू माणूस 

देवालाही

लाच दे शी तू

असा कसा तू माणूस 

बाईची अब्रू

वेशींवर टांगशी

असा कसा तू माणूस 

तूच ठरव माणसा

कां म्हणू

तुला माणूस

चिंता मज याची

तू

कधी होशील माणूस .                                  संजय एम निकुंभ , वसई

                                दि. १८.०१.१३ वेळ : ९.०० स .   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
Re: असा कसा तू माणूस ......
« Reply #1 on: January 19, 2013, 04:24:42 PM »
mansa mansa kadhi hoshil manus